रविवारी दुपारी १२.४८ वाजता शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोडवर गणेश विसर्जनादरम्यान हायटेन्शन वायरमुळे सहा जणांना विजेचा धक्का बसला. यात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला. इतर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर तिघांवर उपचार सुरू आहेत.