जन्मदातीच्या विरहात मानसिक तणाव घेतलेल्या एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. घटना आष्टी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रामनगट्टा येथे उघडकीस आली. भालचंद्र विनायक पेंदाम वय २९ वर्षे, रा. रामनगट्टा, ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृताचे नाव आहे. भालचंद्रचा काका वसंत पेंदाम यांच्या तक्रारीनुसार भालचंद्र हा मागील ३ महिन्यांपासून आईच्या मृत्युमुळे सतत तणावात राहायचा.