वेंगुर्ले तालुक्यातील आडेली या गावामध्ये उपद्रवी ठरलेल्या सात फुटी मगरीला रेस्क्यू करून सावंतवाडी वनविभागाने जेरबंद केले. याबाबतची माहिती आज वनविभागाने देण्यात आली. या मगरीमुळे येथील स्थानिक लोकांना धोका निर्माण झाला होता. गेले कित्येक दिवस या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत होती.