आज शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास रोहा तालुक्यातील धाटाव येथे कुणबी समाज धाटाव ग्रुप सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते संपन्न झाले. हा दिवस कुणबी समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्षासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या सभागृहाच्या निर्मितीमागे कुणबी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा दूरदर्शी विचार आणि समाजसेवेची निखळ भावना आहे. हे सभागृह केवळ एक इमारत नसून समाजाच्या एकात्मतेचे, सहकार्याचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे.