कासार शिरसी येथील अतिरिक्त तहसील स्थापनेचा शासनाचा निर्णय योग्यच : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापनेचा आणि तेथे अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कार्यालय स्थापनेसंदर्भातील शासन निर्णयास आव्हान देणारी 'जनहित याचिका' मंगळवारी फेटाळली.