भारतरत्न पुरस्कार देण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिले आहे. दरम्यान, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबद्दल शिफारस महाराष्ट्र सरकारला देता येत नाही, असे देखील त्यांनी सांगितल आहे. आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा चेहरा उघड करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.