रस्त्यात एका इसमाला डाव्या हाताच्या तळव्यावर कुऱ्हाड मारल्याने इसमाला जखमी केल्याची घटना पंचाळा येथे दिनांक चार तारखेला रात्री आठच्या दरम्यान घडली.. देविदास नामदेव नेहारे वय साठ वर्ष राहणार पंचाळा असे फिर्यादीचे नाव आहे तर राजेश देविदास नेहारे राहणार पंचाळा असे आरोपीचे नाव आहे यासंदर्भात फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दिनांक पाच तारखेला एक वाजून 36 मिनिटांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती आज दिली..