बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असलेल्या एका व्यक्तीने आज शुक्रवार दि.29 ऑगस्ट सकाळी 11:30 वाजता, अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.रामहरी महादेव वायबसे, ही व्यक्ती केज तालुक्यातील कासारी येथील असून, काही वादाच्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणास बसलेली होती. शेवटी कंटाळून त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने त्याला ताब्यात घेतले असून त्