वाशिम शहरातील महालक्ष्मी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित दि. 3 सप्टेंबर रोजी रात्री हिंदुत्ववादी व्याख्याते पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महालक्ष्मी गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन तेथील देखाव्याची पाहणी केली. यावेळी गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविक महालक्ष्मी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष ठाकूर यांनी केले तर व त्यांचा परिचय प्राध्यापक दिलीप जोशी यांनी करून दिला.