धारूर तालुक्यातील मोहखेड गावातील जिल्हा परिषद शाळेची भिंत शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्यांना किंवा गावकऱ्यांना इजा झाली नाही. विशेष म्हणजे मोहखेड हे गाव माजी मंत्री सुंदरराव सोळंके तसेच तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले आ. प्रकाश सोळंके यांचे गाव आहे. अशा गावातील शाळेची अवस्था इतकी दयनीय असल्यामुळे गावकऱ्यांत आणि पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, शाळेच्या इमारतीची दुरुस्ती वेळेवर झाली असती तर असा प्रकार घ