आज सोमवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाड तालुक्यातील लियाकत ढोकळे, असलम ढोकळे, गफूर ढोकळे, रिहान ढोकळे व शादाब ढोकळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मनःपूर्वक स्वागत आणि पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या सर्वसमावेशक पुरोगामी विचारसरणीवर विश्वास व्यक्त केला.