महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याच्या मागणीला घेऊन दि.11 सप्टेंबर रोजी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले. तर मागण्या पूर्ण झाल्यास 12 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद धरणे आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) हा महसूल विभागाचा कणा आहे. विभागातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना शासन स्तरापासून ते गाव पातळीवर पोहोचवण्याचे काम केले जाते.