गंगाखेड तालुक्यातील सायळा सुनेगाव येथील रस्त्याच्या बाजुला असलेल्या नालीत स्त्री जातीचे नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आले.या प्रकरणी पोलीस पाटील गोविंद सुर्यवंशी यांच्या माहीतीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नोंद झाली आहे.