सिरोंचा तालूक्यातील तूमनूर येथील दोन यूवक मित्रांचे मृतदेह सिरोंचा तालूका मूख्यालयापासून १० कीलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगाना राज्यातील चिंतलपल्ली गावानजीक असलेल्या नाल्यावरील पूलाचा खाली आज दि.७ सप्टेबंर रविवार रोजी सकाळी ८ वाजेचा सूमारास आढळून आले आहे त्यामूळे खळबळ माजली आहे दूचाकी अपघातात त्यांचा मृत्यु झाला असावा असा अंदाज आहे. तूमनूर येथील सिधु रामुलू गुरूसिंग वय २१ व नागेश राजन्ना मेहतर वय २५ अशी मृतकांची नावे आहेत.