कोपरगाव : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रिमझिम ते मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस, कपाशी सोयाबीन, मका यांसह भाजीपाला पिकांवर पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके आडवी झाली आहे. काही भागात वार्यासह पावसामुळे झाडे उन्मळून पडली, तर वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे. शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आज २८ सप्टेंबर रोजी केली।