पोहेगाव परिसरातील विजेच्या विविध अडचणी सोडवण्यासंदर्भात आज २९ ऑगस्ट रोजी आ.आशुतोष काळे यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेतली.या बैठकीत पोहेगाव सबस्टेशन, शहा सबस्टेशनला जोडण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच समृद्धी महामार्गालगत असलेला इनामके डीपी लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात यावा अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.याप्रसंगी राहाता उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता डी.डी. पाटील, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.