हिंगोली शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत, यामध्येच आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगोली तालुक्यातील भटसावंगी तांडा हे गाव ओढ्यालगत असल्याने आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्याला महापूर आल्याने गावाला पुराचे पाणी लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाली आहे, यामध्ये पुराचे पाणी ही शेतीत घुसल्याने अनेक शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे, अशी माहिती आज दुपारी बारा वाजता ग्रामस्थांनी दिली आहे.