आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजेच्या सुमारास माहिती देण्यात आली की ,गंगापूर वैजापूर रोडवरील वरखेड पाटी येथे भीषण अपघात अपघातात 2 जण जागेवर ठार तर एक जण गंभीर जखमी आहे. अशी माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक व सागर शेजवळ यांनी तात्काळ धाव घेऊन रुग्णास उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केले , या अपघाताने लोक हळहळ व्यक्त करत आहेत या अपघातातिल मृत व्यक्तीचे नाव संजन राजू राजपूत राहणार कमळापूर रोड वाळूज येथील आहेत.