रायगड जिल्ह्यात दहशतवादी कारवाया व गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केला. यापुढे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना वाहनांचा संपूर्ण तपशील स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवणे बंधनकारक असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती आज गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास देण्यात आली.