रमाई आवास योजना (नागरी) अंतर्गत नवबौद्ध व दिव्यांग घटकांना पहिला हप्ता अखेर मिळणार आहे. गुरुदेव युवा संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर समाज कल्याण विभागाने निधी वितरणास अखेर मंजुरी दिली असून एकूण 537.50 लाख रुपये (पाच कोटी सदोतीस लाख पन्नास हजार) निधीचे वितरण सुरू करण्यात आले आहे.