शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध रस्त्याबाबतच्या मागण्यांसाठी धडक आंदोलन व रास्ता रोको. शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (श.प) पक्षाच्या वतीने विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष, युवा नेते विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध रस्त्याबाबतच्या मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आले. मेनी फाटा ते कोकरूड या राज्य मार्गावर वारंवार अपघात होत असून अनेक प्रवासी व नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्यावरील प्रत्येक गावाजवळ रमलर अथवा गतिरो