आज दिनांक एक सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे जुनी बस स्थानक परिसरात चहाच्या टपरीवर दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास इमरान पठाण या युवकास दुचाकी वर आलेल्या दोन जणांनी चाकू हल्ला करत गंभीर जखमी केले आहे यामध्ये अण्णा करणारे रफिक पठाण व त्याच्या एका साथीदारावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस करत आहे.