पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत नगरधन बीटमध्ये येणाऱ्या नंदापुरी येथील एका 25 वर्षीय युवकाने शुक्रवार दि. 12 सप्टेंबर व शनिवार दि. 13 सप्टेंबर च्या मध्यरात्री दोन ते तीन वाजता च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक युवकाचे नाव हिमांशू दीपक तांडेकर असून त्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या स्लॅबला असलेल्या हुकला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. पो स्टे. रामटेक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास हाती घेतला आहे.