नगर-मनमाड महामार्गावर रस्ते अपघातामध्ये आज सकाळी मृत झालेल्या सेवा निवृत्त कृषी सेवकचा मृतदेह संतप्त नागरिकांनी महामार्गावर आणत जोपर्यंत प्रशासन या रस्त्याबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतल्याने तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. आज शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून १ दुपारी वाजेपर्यंत बालाजी मंदिरासमोर नगर-मनमाड महामार्गावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.