यवतमाळ, दारव्हा, आर्णी, उमरखेडला पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी 2 च्या सुमारास 'जोरधार' पाऊस झाला. देऊरवाडी बुटले येथे वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू आणि दोन जखमी झाले. येथे वीज पडून अहमदखान जब्बारखान (वय 45) यांचा मृत्यू झाला असून रमेश गोविंद चव्हाण (वय 40), दिलीप सकरू पवार (वय 60) हे दोघे जखमी असून त्यांचा प्रथमोपचार करून उपचारार्थ यवतमाळ येथे रवाना केले. हे सर्व देऊरवाडी बुटले येथील गुराखी आहेत.