लघूशंका उडाल्याच्या कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने शेख जूनेद शेख मकदूम (वय २४) याला मारहाण केली. या कारणावरुन दोन गटात वाद होवून दगडफेक होवून तणाव निर्माण झाला होता. ही घटना मंगळवारी २६ ऑगस्ट रोजीरात्री १०.३० वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील हनुमान मंदिराजवळ घडली होती. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तालुका पोलिसांकडून या घटनेची बुधवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अदखलपात्र गुन्ह्याची नोंदीवर बोळवण करण्यात आली.