धुळे शहरातील रथ गल्ली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलांसमोर शिवीगाळ करू नको, असे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रमोद राजू चित्ते वय ३३, रा. विष्णूनगर, देवपूर हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या मानेवर वार करण्यात आले आहेत. ही घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास रथ गल्लीतील एका शाळेच्या पाठीमागे घडली.