बुलढाणा शहरातील विष्णूवाडी परिसरात 29 ऑगस्ट रोजी घराचे कुलूप तोडून भगवान नटराजची मूर्ती अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना घडली.संदीप शशिकांत शुक्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.