भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस येथे भाजप युवा मोर्चा तर्फे राज्यस्तरीय संगीत निमंत्रित भजन स्पर्धा २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दीपप्रजनाने शनिवार २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी भजन ही आपली संस्कृती आणि परंपरा असून ती जपून ठेवण्याचे काम कोकण करत असल्याचे सांगितले.