शहरात व तालूक्यातील शाळा महाविद्यालयात येणार्या विद्यार्थीनीना अलीकडेच टवाळखोर मूलांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे पोलीसानी नियमित गस्त करीत या टवाळखोरांचा बंदोबस्त करीत विद्यार्थीनी निर्भयतेने आपल्या शाळा महाविद्यालयात पोहचतील याची दक्षता घ्यावी या मागणी करीता आज दि.२५ आगस्ट सोमवार रोजी दूपारी २ वाजता यूवती सेनेची माजी जिल्हा प्रमुख प्रा उमा चंदेल यानी उपविभागीय अधिकारी कूरखेडा व कूरखेडा पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले.