छत्रपती संभाजीनगर... आज दिनांक 10 सप्टेंबर दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देशातील पहिलाच सामूहिक महाराष्ट्र गीत गाण्यात येणार आहे. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी हे सामूहिक महाराष्ट्र गीत गायन करण्यात येणार असून यात जिल्ह्यातील 75 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे. यात शहरातील 35 हजार तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 40 हजार विद्यार्थी आपला सहभाग नोंदवतील. यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.