सांगोला तालुक्यातील सोनंद येथे अवैध धंद्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल २ कोटी ६८ लाख ७२ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पंढरपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली. त्यांनी आज ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये तब्बल ५० जणांना अटक केल्याचं ते म्हणाले आहेत.