हिंगोली जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली संयुक्त विद्यमाने फिट इंडिया सायकल स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर फिट इंडिया सायकल स्पर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना , होम डि.वाय.एस.पी. दत्ता केंद्रे, डी.वाय.एस.पी. राजकुमार केंद्रे, डी.वाय.एस.पी. भुसारे , सहाय्यक समादेशक दामनवाड, आदींची उपस्थिती होती.