गडचिरोली शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डेंग्यू, मलेरिया व इतर डासजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेकडून नागरिकांना प्रत्येक रविवारी 'ड्राय डे' (कोरडा दिवस) पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्रत्येक रविवारी 'ड्राय डे' (कोरडा दिवस) म्हणून पाळण्यात यावा. घरातील, परिसरातील, गच्चीवरील तसेच रिकाम्या भांड्यांमध्ये, कुलर, फुलदाणी, टाक्या, बादल्या आदींमध्ये पाणी साचू देऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.