येणारे सण उत्सव शांततेत साजरे करा– पोलीस अधीक्षक निलेश तांबे येणारे सण उत्सव हे शांततेत व आनंदात साजरे करा. तसेच कोणालाही कुठलीही हानी न होता सण साजरे करून नियमाचे पालन करा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. तसेच गणेश उत्सवामध्ये डीजे, पार लाईट, टाळून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा. अशा प्रकारचे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे.