वर्धा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका गुन्हेगाराला आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. पोलिसांनी आज 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर धडक कारवाई मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत, २५ सप्टेंबरच्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वर्धा शहर हद्दीत बोरगाव येथे सापळ्यात १.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.