महिलांच्याच सक्षमीकरणकरणासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. तसेच समाजातील बंधू वर्ग सुद्धा मदतीला असतो. परिषदेमध्ये विविध महिलांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली त्याप्रमाणे आता समाजातील समस्याग्रस्त पीडित महिलांच्या मदतीसाठी महिला कक्ष तयार करूया त्याकरिता महिला प्राध्यापकाने वेळ द्यावा चाकोरी बाहेरचे काम करता येईल खांद्याला खांदा लावून काम केले तर अवघड नाही ही या परिषदेची फलश्रुती असेल असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी शनिवारी सायंकाळी केले.