शासकीय योजनांचा लाभ घेत असताना नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी विविध गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. योजनांचा फॉर्म भरताना दाखल केलेला मोबाईल क्रमांक कधीही बदलू नये. कामगारांनी दरवर्षी आपल्या कार्डाचे नूतनीकरण केले पाहिजे. यासह विविध मार्गदर्शन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज दुपारी मिरची पथारी या ठिकाणी लाभार्थ्यांना भांडे संचाचे वितरण करताना केले आहे.