तळेगाव शिवारात नदी काठावर पाणी पाजण्यासाठी 20 ते 25 मशी आणि बकऱ्या गुरे मालक घेऊन गेला असताना अचानक एक म्हैस पाण्यात उतरल्यावर तडफडू लागली काही क्षणातच कोसळली म्हशीला काय झालं म्हणून मालक लोकेश आगरकर गेले असता त्यांना सुद्धा विजेचा जोरदार धक्का लागला पायात चप्पल असल्यामुळे ते दूरपर्यंत फेकले गेले मालकाने लगेच प्रसंगावधान राखत स्वतः जीव वाचवला आणि इतर म्हशी व बकऱ्यांनाही नदी काठावरून दूर हाकले त्यामुळे अनेक जीव वाचून दुर्घटना टळल्याची घटना आज दुपारी 3.30 ते 4 सुमारास घडली