मुंडीपार सेवा सहकारी संस्थेची वार्षिक आम सभा मुंडीपार येथे दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घेण्यात आली. या सभेत सन 2024 ते 2025 वर्षाचे जमाखर्च नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे, थकीत सभासदांची यादी सभेत वाचून दाखविणे व त्यावर कारवाई करण्याबाबत विचार करणे. उपविधी दुरुस्ती करण्याबाबत तसेच सन 2025 ते 2026 या वर्षाचे ऑडिट करण्याकरिता ऑडिटरची नियुक्ती करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.