देवलापार वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दुलारा (करवाई ) येथील शेतकरी रामदयाल बागबंदे हे त्यांच्या शेताशेजारी बैल चारत असताना दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानक हल्ला करून त्यांच्या एका बैलाला ठार देण्याची घटना सहा सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. ही माहिती वनपाल डोंगरे यांनी रविवार दिनांक सात सप्टेंबरला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान दिली. या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असल्याचेही त्यांनी सांगितले.