सांगली कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलावरून शनिवारी दुपारी कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील अनिता अरविंद हजारे (वय ५०) यांनी नदीत उडी मारली होती. काल शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून अनिता हजारे यांचा शोध स्पेशल रेस्कु फोर्सच्या माध्यमातून सुरू होता, आज सकाळपासून शोध मोहिमेला सुरवात करण्यात आली होती.रविवारी सायंकाळी चार वाजता अनिता हजारे यांचा मृतदेह अंकली पुलापासून काही अंतरावर नदीत सापडला आहे. कोल्हापूर रोडवरील अंकली पुलावर पत्नीने मोबाईल पतीच्या हातात देऊन थेट नदीत उडी