30 ऑगस्ट रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी सीवूड्स स्टेशन ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स असा लोकल ट्रेन ने प्रवास केला. त्यांच्या मंत्रालयीन तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये साधारण 16 ते 17 वर्षे प्रवास लोकल ट्रेन ने केलेला आहे. 1994 ते 2009 पर्यंतच्या जुन्या आठवणींना आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला उजाळा. मुंबईतील चाकरमान्यांन सारखं आयुष्य मी जगलो अनुभवलो आहे. आज बऱ्याच वर्षानंतर पुन्हा तोच अनुभव घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.