जलालखेडा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून 28 ऑगस्ट ला दुपारच्या सुमारास कारने प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव विक्रम कोरडे व गुणवंत वघाडे असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून कार तसेच 259.3 किलो प्रतिबंधित तंबाखू असा एकूण सहा लाख 92 हजार 352 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जलालखेडा पोलीस करीत आहे