गणेशोत्सवाचा मुहूर्तावर मुंबई भेटीवर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी दुपारी १२.२५ च्या सुमारास वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी अमित शाह यांच्या पत्नी सोनलशाह, पुत्र जय शाह आणि इतर कुटुंबीय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.