कळमनुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे रामवाडी येथील दुर्गा भगवान टाले वय 21 वर्षे या विद्यार्थिनीने दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रामवाडी शेत शिवारात एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून,कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहावर शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सूत्राकडून प्राप्त झाली आहे .