समुद्रपूर:कोरा येथील अनिल सायकाटे यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडरमुळे लागलेल्या आगीत घरावरील छत, अन्नधान्य, जीवनोपयोगी वस्तू तसेच कुलर, मिक्सर आदी साहित्य जळून खाक झाले.या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.आगीच्या प्रसंगी राम गेडाम (रा. कोरा) यांनी धाडसाचे उदाहरण घालून दिले. सिलेंडर पेटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत राम गेडाम यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मित्रांच्या व वॉर्डातील नागरिकांच्या मदतीने सिलेंडर गावाबाहेर नेले