मोताळा तालुक्यातील खडकी फाट्याजवळ भरधाव एसटी बसच्या धडकेत अकरा मेंढ्या ठार तर सहा मेंढ्या जखमी झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. या अपघातात संबंधित मेंढपाळाचे १ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत शांताराम संजु बिचकुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसटी बस चालक सुभाष धुमा राठोड विरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.