नेपाळमधील जनरल झेड निदर्शनांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, जर तुम्ही वारंवार लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर बांगलादेश आणि नेपाळमध्ये आपल्याला त्याची उदाहरणे आधीच दिसतात. लोकांना गप्प बसवणे हा लोकशाहीवर हल्ला आहे आणि आम्ही त्याचे समर्थन करत नाही.