सोलापूर सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित पर्यटन सप्ताह २०२५ निमित्त अकलूज येथील शिवसृष्टीला भेट देऊन परिसराची पाहणी केली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रममय जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांची अप्रतिम शिल्पकला साकारलेली आहे. विशेषतः राज्याभिषेक सोहळा, अफझलखान वध, तसेच स्वराज्य स्थापनेशी संबंधित प्रसंगांचे दर्शन अत्यंत प्रभावी ठरते. पर्यटन सप्ताहात अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यामागील उद्देश म्हणजे नव्या पिढीला आपल्या इतिहासाशी जोडणे आणि स्थानिक पर्यटनाला चालना देणे हा आहे.